करमाळा प्रतिनिधी

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करमाळा तालुकास्तरीय योगासन स्पर्धा महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे पार पडली. या स्पर्धेत महात्मा गांधीं विद्यालय येथील विद्यार्थी सहभागी झाले.

योगासन स्पर्धेत महात्मा गांधीं विद्यालय करमाळा येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. 14 वर्षे वयोगट मुले कुमार रणवीर चेंडगे इ 6 वी प्रथम क्रमांक, जयराज दळवे इ6 वी द्वितीय क्रमांक, सर्वेश गलांडे  इ6 वी तृतीय क्रमांक यांनी

यश प्राप्त केले. 14 वर्षे वयोगट मुली कुमारी स्वरा गपाट इ. 6 वी प्रथम क्रमांक, संस्कृती पाटोळे इ. 6 वी द्वितीय क्रमांक, अक्षदा घोलप, इ. 6 वी तृतीय क्रमांक, 17वर्षे वयोगट मुले प्रणव वीर इ. 10 वी प्रथम क्रमांक, कृष्णा भोरे इ. 10 वी द्वितीय

क्रमांक, आदित्य नलवडे इ. 10 वी तृतीय क्रमांक, कृष्णा जाधव इ. 10 वी चौथा, 17   वर्षे वयोगट मुली साक्षी खुळे इ. 9 वी प्रथम क्रमांक, 19 वर्षे वयोगट मुली सृष्टी चांदगुडे  ई. 11 वी  प्रथम क्रमांक, संयुक्ता सोनके 11 वी द्वितीय क्रमांक या सर्व

खेळाडूने योगासन स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले. संस्थेचे चेअरमन जयवंतराव जगताप, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, संस्थेचे विश्वस्त शंभूराजे जगताप यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच संस्थेचे मुख्याध्यापक कापले सर.

उपमुख्याध्यापक बागवान सर, जेष्ठ पर्यवेक्षक पाटिल सर, पर्यवेक्षिका नवले मॅडम, ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख पवार सर यांनी खेळाडूंचे गुलाब पुष्प गुच्छ देउन अभिनंदन केले. तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक दळवे सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेतील शिक्षक, शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंना पुढिल यश प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सुत्र संचालन पुजारी सर यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *