करमाळा प्रतिनिधी

आपली भगीनी निलीमा चव्हाण हत्या प्रकरणी निषेध करण्यासाठी काळी रीबीन बांधुन करमाळा येथे नाभिक समाज, सावंत गट, आरपीआय, दलित सेना, भाजप, शिवसेना, काँग्रेस, आदिंनी निषेध व्यक्त केला.

नीलिमा चव्हाण मृत्यू…..

चिपळूण येथे नाभिक समाजाची बैठक झाली असे महादेव चव्हाण यांनी सांगितले. परिसरातील नाभिक बांधव आणि बहुजन समाज उपस्थित होता. नीलिमा फक्त नाभिक कन्या नव्हती तर ती बहुजनांचीही लेक होती, असा निर्धार करून बहुजन समाज नीलीमाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे आला आहे.

आंदोलनाची दिशा.

१५ ऑगस्ट रोजी राज्यभरातील प्रत्येक समाज बांधवांनी आपल्या दंडावर काळ्या फ़िती लाऊन सलून काम करावे व शक्यतो निषेधाचे बोर्ड आपल्या दुकानात लावावे. दि. २२.८.२०२३ रोजी बहुजन (ओबीसी व ईतर समाज बांधव मिळून) “बहुजन आक्रोश

मोर्चा” चिपळूण येथे काढणार आहेत. अधिकची माहिती महादेव चव्हाण तयार करून ग्रुप वर पाठवणार आहेत, ज्यांच्या कडे ही माहिती येईल त्यांनी लगेच राज्यभरातील सर्व ग्रुप वर फॉरवर्ड करावी असे सांगण्यात आले होते. त्यानुसार करमाळयात

काळया फिती लावून महात्मा गांधी पुतळा, तहसील परिसरात, दुकानात विविध पदाधिकारी संघटनांनी निषेध केला आहे. यावेळी सावंत गटाचे नेते सुनील सावंत, आरपीआयचे राष्ट्रीय सदस्य रमेश कांबळे, भाजपचे विठ्ठलराव भणगे,शिवसेनेचे

संजय शिंदे, दलित सेनेचे नलिनी कांबळे, नाभिक समाजाचे नारायण पवार,हरिभाऊ गवळी, अनिल क्षीरसागर,राजेंद्र पवार, जयंत दळवी, महादेव यादव,अच्युत दळवी,संभाजी काशिद,नवनाथ जगताप, पोथरेकर दळवी, दिनेश पवार, काशिद बंधू, योगेश दुधाळ,मार्तंड सुरवसे, रंदवे, आदिजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *