
करमाळा प्रतिनिधी
दि. ६ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑल इंडिया उशु फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या 22 व्या राष्ट्रीय ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धा बिहार पटना येथील पाटलीपुत्र क्रीडा संकुल येथे मोठ्या उत्साहाने पार पडल्या. या स्पर्धेत दत्तकला इंटरनॅशनल स्कूल ची इयत्ता अकरावी सायन्स ची विद्यार्थिनी वैष्णवी तुषार मोहिते हिने 56 किलो वजनी गटामध्ये तृतीय क्रमांक मिळविला.

या विजेते विद्यार्थी ला मार्गदर्शन क्रीडाशिक्षक प्रदीप सुनील शिवपुजे सर यांनी केले. या विद्यार्थिनीचे अभिनंदन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सर, उपाध्यक्ष राणा दादा सूर्यवंशी सर, सचिवा माया झोळ मॅडम, प्राचार्य नंदा ताटे मॅडम, प्राचार्य सिंधू यादव मॅडम या विद्यार्थिनीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.



