सावडी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार:गणेश चिवटे
करमाळा :- सावडी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची भूमिका सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा करमाळा भाजपाचे अध्यक्ष गणेश चिवटे यांनी मांडली.आज त्यांच्या हस्ते मौजे सावडी येथील आज दोन रस्त्याच्या कामांचे उद्गाठण करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,सावडी गावचे उपसरपंच महेंद्र एकाड यांनी स्वखर्चातून सावडी ते भराटेवस्ती व भोसले वस्ती ते ननवरे वस्ती या दोन रस्त्यावर मुरूमकरण केले.या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते होत आहे हे मी माझे भाग्य समजतो.सावडी गावचे उपसरपंच महेंद्र एकाड यांनी स्वखर्चातून केलेले केलेले रस्त्याचे काम उल्लेखनीय व प्रसंशनीय आहे. समाजाच आपण काहीतरी देण लागतो या उदात्त भूमिकेतून त्यांनी सदरच्या रस्त्यासाठी खर्च केला आहे. समाजाला आज एकाड यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे.केंद्रात व राज्यात आता भाजपा सरकार

आहे.कोणत्याही शासकीय -प्रशासकीय अडी अडचणीसाठी मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे ते म्हणाले समाजातील प्रत्येक वंचीत शोषित घटकासाठी सरकार अनेक योजना तयार करत आहे.त्याचा लाभ लोकांनी घेतला पाहिजे.कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अडचण येत असल्यास लोकांनी भाजपा कार्यकर्ते किंवा थेट माझ्याशी संपर्क करावा.जेष्ठ नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना,शेतकऱ्यांसाठी सेस फंडातून 50% अनुदानवर औजारे,बांधकाम कामगासाठी अनेक योजना आहेत त्याचा लाभ गरजूनी घ्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना केले. यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे,अमोल पवार सोमनाथ घाडगे,आदिनाथ सुरवसे,दासाबापू बरडे,भैया गोसावी,पै.अफसर जाधव,संजय किरवे,सागर भराटे,हनुमंत एकाड,विक्रम एकाड,श्रीराम मचले,शरद एकाड यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *