
सोलापूर जिल्हा (पंढरपूर विभाग) संभाजी ब्रिगेड ची आढावा बैठक जेऊर ता.करमाळा येथे संपन्न..
करमाळा प्रतिनिधी
शिवश्री प्रवीण दादांनी सूचना केल्याप्रमाणे संघटनेची तळापासून बांधणी मजबूत केली पाहिजे म्हणूनच महिन्याच्या पहिल्या

रविवारी प्रत्येक तालुक्यात आढावा बैठक व संघटन बांधणी कार्यक्रम केला जातो. त्याच अनुषंगाने आज जेऊर ता.करमाळा येथे पंढरपूर विभागाची आढावा बैठक आयोजित केली होती,या बैठकीस बोलताना प्रदेश संघटक दीपक दादा वाडेकर म्हणाले

संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सामाजिक कार्य करत असताना काही अडचणी आल्यास व कोणताही अन्याय अत्याचार करत असल्यास महाराष्ट्रातील संभाजी ब्रिगेड यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभी राहिली असे ते म्हणाले. व

संभाजी ब्रिगेडचे विचार व माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप मिसाळ व श्याम कदम यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेश संघटक दीपक दादा वाडदेकर,पुणे विभागीय अध्यक्ष श्याम भैया कदम,विभागीय उपाध्यक्ष राजू मगर,जिल्हा अध्यक्ष प्रदीप मिसाळ पाटील करमाळा, तालुका अध्यक्ष सुहास पोळ, माढा

तालुका अध्यक्ष सौरभ भोसले, सांगोला तालुका अध्यक्ष राजू शिंदे, सरपंच विकास बापू गुंड, जेऊर शहराध्यक्ष अतुल निर्मळ, निलेश पाटिल, हेमंत शिंदे, आदिनाथ माने, पिंटु जाधव, सचिन गारुडे, गणेश नाईकनवरे, अर्जुन नाईकनवरे, अविनाश घाडगे,

नानासाहेब पोळ, सचिन पोळ, वैभव मोहिते, अभिजीत म्हमाणे, सागर लोंढे, सागर बनकर, विश्वनाथ सुरवसे, रंजीत कांबळे, बंडू मोहिते, तसेच सांगोला, माढा,करमाळा,पंढरपूर,येथील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत
1- बाळासाहेब तोरमल
सोलापूर जिल्हा संघटक

2 – सागर साखरे-करमाळा तालुका उपाध्यक्ष
3 – नवनाथ खबाले- करमाळा तालुका संघटक
4 – अजित उपादे जेऊर शहर उपाध्यक्ष
यांची निवड करण्यात आली. व आभार बाळासाहेब तोरमल यांनी मानले.