करमाळा नगरपरिषदेसमोर सीसीटीव्ही बसवावे व वाॅचमन ठेवावा – राजश्री माने माजी नगरसेविका

करमाळा प्रतिनिधी

करमाळा नगर परिषदेच्या मालकीचा आरोग्य विभागातील कचरा वाहून नेण्याचा ट्रॅक्टर रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार करमाळा पोलीस स्टेशन येथे दिलेली नसुन ट्रॅक्टरचा शोध नगरपालिकेचे कर्मचारी घेत आहेत. असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून नगरपालिकेत नाईट वाॅचमन आणि नगरपालिके समोर सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, अशी मागणी माजी नगरसेविका राजश्री माने यांनी केली आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, सदर ट्रॅक्टर हा जुना असला तरी त्याच्यासोबत एक नवीन ट्रॉली चोरटे घेऊन गेले आहेत. रविवारी स्वच्छतेची सर्व काम आटोपल्यानंतर आरोग्य विभागाचे कर्मचारी जात असताना कार्यालय प्रमुखांच्या निवासस्थानासमोर तीन ट्रॅक्टर होते. त्याच दिवशी रात्री त्यातील एक ट्रॅक्टर चोरीला गेला असल्याचे सोमवारी सकाळी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले.

या कर्मचाऱ्यांनी नगरपरिषद अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली व ट्रॅक्टर-ट्राॅलीची शोधाशोध सुरू झाली आहे. असे प्रकार भविष्यात घडू नयेत म्हणून करमाळा नगरपरिषदेसमोर सीसीटीव्ही बसवणे अत्यंत गरजेचे तर आहेच पण त्या बरोबर वाॅचमन असणे देखील आवश्यक असल्याचे माने यांनी सुचविले आहे.

सध्या पालिकेचा पुर्ण कारभार प्रशासकीय अधिकारी पाहत आहेत. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी कोणीच नाही. त्यांच्या दुर्लक्षामुळेच असे प्रकार होत आहेत, असेही माजी नगरसेविका राजश्री माने यांनी शेवटी सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *