
तहसीलदारांची येत्या २० जून पर्यंत नियुक्ती न झाल्यास आंदोलन – मांढरे पाटील
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका साठी नवनियुक्त तहसीलदार येत्या २० जून पर्यंत नियुक्ती न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करणार

महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मुंबई येथील निवास्थान समोर आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे करमाळा तालुका अध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी दिला आहे यावेळी पुढे बोलताना करमाळा तालुका मधील तहसीलदार समिर माने यांची बदली होऊन जवळ पास दोन महिने झाले तरी देखील करमाळा तालुका साठी नवनियुक्त

तहसीलदार नियुक्ती केली जात नाही. या मुळे करमाळा तालुका मधील सामान्य नागरीकांना प्रशासकीय कामासाठी अनेक अडचणी येत आहेत. आर्थिक लुट होत आहे तक्रार करायचं कोणा कडे हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रांत अधिकारी तसेच तहसीलदार नसल्यामुळे सर्व सामान्य जनतेची गैरसोय होत आहे. प्रशासकीय अधिकारी वरती कोणाचे नियंत्रण राहिले नाही.

शासकीय कार्यालय धर्मशाळा झाले आहेत त्या साठी आपण विरोधीपक्ष नेते आ.अजितदादा पवार यांची भेट घेऊन परिस्थिती त्यांच्या समोर मांडणार आहे. तसेच येत्या २० जून ला करमाळा तालुक्यामधील तहसीलदार व प्रांत अधिकारी यांचा प्रश्न

मार्गी न लावल्यास मुंबई येथील महसूल मंत्री यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने दि.२१ जून पासून अमरण उपोषण केले जाईल आशी माहिती तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे -पाटील यांनी दिली आहे.
