
स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये उत्तम असे उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते – मुख्याध्यापिका दळवी
करमाळा प्रतिनिधी
स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये उत्तम असे उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते, अशी माहिती संस्थेच्या सचिव तथा मुख्याध्यापिका धनश्री जयंत दळवी यांनी दिली आहे.

यावेळी ते म्हणाले कि, सी. बी. एस. ई. अभ्यास क्रमावर आधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कौशल्य विकासावर आधारित शिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षित गुणवत्ताधारक प्रेमळ होतकरू कष्टाळू आणि अभ्यासपूर्ण अनुभवी शिक्षक वृंद

आहे अनुरूप अशी ज्ञानाची बांधणी केली जाते, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो, गोष्टी सांगताना बोलक्या बाहुल्यांचा वापर विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते, विविध उपक्रमाद्वारे व खेळण्याद्वारे शिक्षण घेतले जात आहे,

सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, शिक्षण मजेदार बनविण्यासाठी विविध कविता व गोष्टींचा वापर केला जात आहे. समुपदेशन घेतली जाते, मुलांच्या अंगी असणारे सुप्त गुण ओळखून संधी दिली जाते, विविध शालेय उपक्रमांमध्ये

पालकांचा सहभाग नोंदविला जात आहे, विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिर केली जाते, शिक्षक व पालक यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी शिक्षक-पालक सभेचे नियमित आयोजन केले जाते, शालेय मैदान भव्य असे आहे,

खेळण्यासाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात, संपूर्ण शाळा सीसीटीव्ही कक्षेत आहे, प्रत्येक वर्षात मर्यादित विद्यार्थी घेतले जाते, मुक्तपणे शिक्षकांशी संवाद, बोलक्या भिंती, अध्ययन, स्वच्छता व स्वयंसेवी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा सुरक्षितता वाहन

सेवा पुरवली जात आहे, असेही अखेर स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलच्या सचिव तथा मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांनी सांगितले आहे.