
करमाळ्यातील प्रसिद्ध किराणा व्यापारी दिलीप कटारिया यांचे निधन
करमाळा प्रतिनिधी
शहरातील मारवाड गल्लीतील प्रसिद्ध किराणा व्यापारी दिलीप शांतीलाल कटारिया (वय-६४) यांचे आज (शनिवार) सायं. 5 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

उद्या सकाळी 10 वाजता त्यांच्या राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघेल.
दिलीप कटारिया यांची नुकतीच करमाळा अर्बन बँकेच्या संचालकपदी निवड झाली होती. त्यांच्या मागे दोन भाऊ, दोन भगिनी, पुतणे, पत्नी, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.


