
करमाळा शहरामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करमाळा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस

निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती एम. एन. जगदाळे पोलीस उपनिरीक्षक करमाळा, पंचायत समिती सदस्य दत्ता जाधव, माजी सरपंच रेवन्नाथ पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव

बनकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष आजिनाथ इरकर, जनशक्ती शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष किशोर शिंदे, करमाळा धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष धनंजय कोळेकर, पांडे ग्रामपंचायतचे माजी सदस्य भारत

पाटील, दादासाहेब नरोटे, महाराष्ट्रा चॅम्पियन महिला कुस्तीगीर पल्लवी सुपनवर, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण होगले, तालुका अध्यक्ष जीवन होगले, धनगर समाज उन्नती तालुका उपाध्यक्ष तात्यासाहेब काळे, शंकर सुळ, गहिनाथ वीर, किशोर कांबळे,

बहुसंख्य धनगर समाज व बहुजन समाज भरपूर लोक उपस्थित होते. यावेळी बोलताना गुंजवटे म्हणाले की, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तीस वर्ष अखंड हिंदुस्तान वर आदर्श राज्यकारभार केला, महिला सती जाण्याची पद्धत

बंद केली व स्त्री ला शिक्षण घेण्याची मुभा राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या राज्यामध्ये सुरू केली, गोरगरिबांना राज्यामध्ये सरकारच्या जमिनी कशासाठी दिल्या, दरोडेखोरांना सुद्धा शिक्षा न करता त्यांना रोजगार मिळवून दिला, सैन्यामध्ये भरती केले, स्वतःच्या मुलाला शिक्षा देण्यासाठी सुद्धा त्यांनी कसर केली नाही, त्यांनी भरपूर न्यायदान केले. मिरवणुकीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी झाली. मिरवणूक शांततेमध्ये पार पडली महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब सुपनवर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.