
मकाईचा निकाल दोन तीन दिवसात
करमाळा प्रतिनिधी
तालुक्याचे लक्ष लागलेल्या तालुक्यातील मकाई सह. सा. कारखान्याच्या निवडणुकीत छाननी वेळी अवैध ठरवण्यात आलेल्या २१ उमेदवारांच्या अपीलावरील सुनावणी प्रादेशिक सह संचालक (साखर) राजेंद्र कुमार दराडे यांच्यासमोर आज सोमवारी दुपारी तीन नंतर सुरू झाली.

सव्वा पाच वाजेपर्यंत युक्तिवाद झाल्यानंतर या सुनावणी वरील निकाल दोन ते तीन दिवसांत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.या सुनावणीला प्रा. रामदास झोळ, सविताराजे राजेभोसले उमेदवार आणि ईतर कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सध्या मकाई कारखान्यावर माजी चेअरमन दिग्विजय बागल गटाचे वर्चस्व आहे. या निकालाकडून सर्व ऊस उत्पादक सभासद, उमेदवार यांचे लक्ष लागले आहे. रामदास झोळ व सविता राजेभोसले यांनी सांगितले कि, आमचे सर्व अर्ज मंजूर होतील अशी आशा व्यक्त केली.


