सावरकरांच्या जयंती निमीत्त माजी आ.पाटील यांच्या उपस्थतीमध्ये कार्यक्रम

करमाळा प्रतिनिधी

अखील भारतीय ब्राह्मण संस्थेच्या वतीने क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात मा.आ.नारायण पाटील यांच्या व माजी सैनिक हनुमंत जगताप यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी भाजप चे तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके यांनी सावरकर यांच्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील कार्यावर व त्यागावर प्रकाशझोत टाकला.

अखील भारतीय ब्राह्मण संघटनेच्या वतीने शालेय विद्यर्थ्यांना शालोपयोगी साहित्य मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

त्याबरोबरच राजुरी येथील शिवाजी जाधव यांची भाजपा पंचायतराज च्या तालुका सह संयोजक पदी निवड झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर गोशाळेत जनावरांना हिरवा चारा वाटप करण्यात आला.

यावेळी सूत्रसंचालन नरेंद्रसिंह ठाकुर यांनी केले व सर्वांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी केले. यावेळी आबा टापरे, शाम सिंधी,  शिवाजी जाधव, बाळासाहेब होसिंग, राजेंद्र भोसले, राजेंद्र सूर्यपुजारी,मनोज कुलकर्णी, दिनेश मडके आदींसह ब्राह्मण संघटनेचे पदाधिकारी उपस्थीत होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *