मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मार्चमध्ये कामाला ६० कोटी रुपये निधी मंजूर

करमाळा प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मार्चमध्ये या कामाला ६० कोटी रुपये निधी मंजूर झाला. हे काम पूर्ण झाल्याने लवकरच तालुक्यातील ५०००  हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना खा. नाईक निंबाळकर यांनी दिली.

लोकार्पणसाठी सज्ज झालेल्या करमाळा तालुक्यातील पोंधवडी-वंजारवाडी चारीच्या कामाच्या पहाणी करीता आले असा पत्रकारांनी त्यांच्याशी बातचीत केली त्यावेळी ते बोलत होते. या चारीच्या कामासाठी खा. नाईक निंबाळकर यांनीच जास्त जोर लावून पाठपुरावा केला होता. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष चिवटे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, करंजेचे सरपंच काकासाहेब सरडे, संजय घोरपडे, जयंत काळे पाटील, गणेश गोसावी, महादेव गोसावी, बाळासाहेब कुंभार, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, वंजारवाडी सरपंच प्रवीण विनवडे, विहाळचे सरपंच मोहन मारकड, अंजनडोहचे सरपंच अरुण शेळके, मोरवड सरपंच रामभाऊ कुदळे, पोंधवडी सरपंच येडे, जातेगाव सरपंच ससाने, पोथरे गावचे नितीन झिंजाडे, डीसीसी माजी संचालक भार्तरीनाथ अभंग, भाऊसाहेब शिंदे, यांसह चारीचा लाभ मिळणारे बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना खासदार निंबाळकर म्हणाले की, 31 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत या कामासाठी निधी देण्याचे ठरले होते. जुलै महिन्यात या चारीत पाणी सोडण्यात येणार असताना केवळ शेतकरी बांधवांच्या मागणीसाठी येत्या सात दिवसात तीन दिवसासाठी पाणी सोडण्याचा सूचनाही आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना दिला असल्याने प्रायोगिक तत्त्वावर हे पाणी या चारीत आपल्याला पहावयास मिळणार आहे. असे शेवटी खासदार नाईक निंबाळकर म्हणाले.

चौकट

भैरवनाथ कारखान्याकडून येळे वस्तीवरून पोंधवडीकडे गेलेल्या या चारीत कुकडीचे पाणी सोडण्याचे नियोजन आहे. यासाठीचे आवश्यक कामे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आग्रही पाठपुराव्यामुळे पूर्णत्वास्वास गेलेले आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या चारीच्या पाण्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हासू पाहायला मिळणार आहे. भाजप तालुका अध्यक्ष गणेश चिवटे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *