
टेंभूर्णी जातेगाव महामार्गाचे काम लवकरच चालू करण्यात येईल-मंत्री नितीन गडकरी
करमाळा प्रतिनिधी,
टेंभूर्णी जातेगाव महामार्गाचे काम लवकरच चालू करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले

आहे.
टेंभूर्णी जातेगाव महामार्गाचे काम त्वरित चालू करणेसाठी केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी यांच्याशी चर्चा करताना मा. केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांचे स्वीय सचिव करमाळ्याचे सुपूत्र प्रतिक नाथाजी शिंदे उपस्थित होते.

गडकरी म्हणाले की सध्या रस्त्यासाठी ज्या अडचणी निर्माण होत आहेत. त्या पुढील आठवड्यात पुर्ण करू या आवश्यक कागदपत्रे संबंधित विभागात जमा करा. त्याची त्वरित शासकीय कामकाज करुन कायमस्वरूपी मार्ग काढला जाईल व रस्ता

पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करू या असे मंत्री गडकरी यांना सांगितले असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.
