
करमाळा तालुक्यातील वंजारवाडीच्या लेकीचा देशात UPSC मध्ये ५३० वा क्रमांक
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी बातमी आहे. आपल्या करमाळा तालुक्यातील वंजारवाडी सारख्या अतिशय छोट्या गावातील शुभांगी सुदर्शन केकाण या लेकीने UPSC मध्ये पास होऊन देशात ५३० वा नंबर पटकावला आहे.

ह्या यशाने महाराष्ट्र बरोबरच आपल्या करमाळाकरांची मान उंचावली असून, शुभांगी सुदर्शन केकाण यांनी मिळवलेल्या यशाबद्दल करमाळा तालुक्यातून सर्व स्तरावरून त्यांचे विशेष अभिनंदन केले जात आहे.

शुभांगी यांचे वडील सुदर्शन केकाण हे निवृत्त शिक्षक आहेत. शुभांगी यांचे शिक्षण बिडीएस झाले आहे. त्या वंजारवाडीची लेक असून करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी हे त्यांचे सासर आहे. पण सध्या वैद्यकीय सेवेसाठी त्या अहमदनगर जिल्ह्यात स्थायिक आहेत.

