
प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालयाचे विद्यापीठ परीक्षेमध्ये घवघवीत यश
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालयाच्या बी. एससी भाग २ च्या विद्यार्थिनी दिव्या सुपेकर (९४.३३) टक्के व प्रांजली सुरवसे (९४.०० टक्के) यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आयोजित तृतीय सत्राच्या परीक्षेमध्ये विद्यापीठामध्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.

त्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर च्या सीनेट व व्यवस्थापन परिषद सदस्या आदरणीय पद्मजादेवी मोहिते-पाटील, महाविद्यालयाचे मार्गदर्शक संचालक डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, उच्च शिक्षण विभागीय सहसंचालक (सोलापूर विभाग) डॉ. काकडे, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय नातेपुते चे प्राचार्य डॉ. चंद्रकांत कोळेकर, प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रवीण देशमुख आदींनी अभिनंदन केले व पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी व्यक्त होताना डॉ. देशमुख म्हणाले की, राज्याचे नेते लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या दूरदृष्टीतून व करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांची विज्ञान शिक्षणाची गरज ओळखून ह्या महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आणि आज खऱ्या अर्थाने त्यांचे स्वप्न पूर्णत्वास जाताना खूप आनंद होत आहे, अशाच प्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन करून महाविद्यालयाचे व आई वडिलांचे नाव उंचावावे अशी अपेक्षा केली.

या विद्यार्थिनींना डॉ. देशमुख, प्रा. जाधव व प्रा. चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या विद्यार्थिनींच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
