शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही तर साखर कारखान्याच्या चेअरमनला रस्त्यावर फिरू देणार नाही – विनय ननवरे

करमाळा प्रतिनिधी

थकीत उसाची बिले मिळावीत अन्यथा साखर कारखान्याच्या चेअरमनला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा ईशारा पुर्व भागाचे नेते विनय ननवरे यांनी दिला आहे.

मकाई, भैरवनाथ, कमलाई या कारखान्यांनी 30 एप्रिल पर्यंत उसाची बिले काढतो म्हणाली, काढली नाही ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्या मुला मुलींचे लग्न, आदी अडचणी निर्माण झाल्या आहे. मकाई, भैरवनाथ, कमलाई या कारखान्यांनी थकीत उसाची बिले शेतकऱ्यांची काढली नाहीत. कारखान्याचे चेअरमन गेंड्याच्या कातडीचे आहेत, निर्दयी आहेत,

शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळतात शेतकऱ्यांच्या प्रपंच्याचे काही घेणे देणे नाही, मकाई साखर कारखान्याने नोव्हेंबर महिन्या पासुन ऊसाची बिले थकवली आहेत, शेतकऱ्यांनी कसे जगावे चेअरमनला याचे कसे काय वाटत नसेल. त्यामुळे  कारखान्याचे चेअरमन  घराच्या बाहेर पडले कि त्यांच्या गाडया आडवणार त्यांना फिरू देणार नाही कारखान्याच्या चेअरमन शेतकऱ्यांना

ऊसाची बिले मिळेपर्यंत आपला लढा चालूच राहील साखर सम्राटांच्या विरुद्ध आपण रणशिंग फुंकले असून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे असे पुर्व भागातील नेते विनय ननवरे यांनी सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *