आदिनाथच्या लेटरवर मकाईचा शिक्का झोळ यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली तक्रार
करमाळा प्रतिनिधी
करमाळा श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दाखल झालेल्या अर्जावर आक्षेप आले आहेत. त्यावर सुनावणी झाल्यानंतर ‘आदिनाथच्या लेटरपॅडवर मकाईचा शिक्का’ असा दाखला आहे ? याप्रकरणात बागल विरोधी गटाचे प्रा. रामदास झोळ यांनी जिल्हाधिकारी व साखर आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दाखल झालेल्या अर्जाची शुक्रवारी (काल) छाननी झाली. त्यात बागल गटाने छाननीवेळी आक्षेप घेतले आहेत. आक्षेप असलेल्या अर्जावर उमेदवाराला देण्यात आलेल्या प्रतीवर (आदिनाथ कारखान्याचे लेटरपॅड) मकाईचा शिक्का दिसत आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत.
सुनावणीवेळी कोणतीही चर्चा झालेला नाही. संपूर्ण सुनावणी झाल्यानंतर ही चर्चा सुरु झालेली आहे.
बागल विरोधी गटाचे प्रमुख प्रा. रामदास झोळ यांनी या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. बनावट कागदपत्रे देऊन फसवणूक केली असल्याचे त्यांनी यामध्ये म्हटले आहे. अशी फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचीही मागणी त्यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांचीही दिशाभूल असून फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. करमाळ्याचे पोलिस निरीक्षक यांनाही त्यांनी याबाबतचे निवेदन दिले असून हरकतदार व फसवणूक करणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *