हुतात्मा शाहीर लालासाहेब वाघमारे यांची जयंती

जेआरडी माझा

हैदराबाद मुक्ती संग्रामातील हुतात्मा शाहीर लालासाहेब वाघमारे यांची जयंती धामणगाव ( दु) येथे ऊत्सहात साजरी.

हैदराबाद मुक्ती संग्रामातील हुतात्मा शाहीर लालासाहेब वाघमारे यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त दि.१९ मे  रोजी त्यांचे जन्मगाव धामणगाव (दुमाला) तालुका बार्शी या ठिकाणी राष्ट्रीय नाभिक संघटना प्रदेश युवक अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर यांच्या शुभहस्ते त्यांच्या प्रतिमेचे व हुतात्मा स्तंभाचे पुजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शिवाजी पाटील हे होते.

यावेळी लालासाहेब वाघमारे यांच्या इतिहास ऊपस्थीतांनी भाषणामध्ये बोलताना सांगीतला.

यावेळी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर यांनी स्मारकाच्या सुशोभिकरणाबाबत तसेच स्मारकातील सुखसोयीबाबत,पुतळा निर्मीती बाबत,देखभालीबाबत ग्रामपंचायतीला निवेदन दिले.

सदर निवेदन स्वीकारल्यानंतर सरपंच शिवाजी पाटील यांनी निवेदनाबाबत तत्काळ कारवाई करु असे अश्वासन ऊपस्थीतांना दिले.

या वेळी धामणगावातील ग्रामसेवक राहूल गरड,ऊपसरपंच नानासाहेब कदम,पोलीस पाटील गणेश मासाळ,सदस्य दत्ताञय ढेकणे,सदस्या रोहीणी ताटे,शाहीर भिमसेन आलाट,अशासेविका,प्रतिष्ठीत नागरीक,स्वातंञ्यसैनिक,मा.सैनिक तसेच धामणगाव नगरीचे नागरीक, अखिल भारतीय जिवा सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे,जिल्हा संघटक गोवर्धन

आलमले,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख प्रशांत लाडुळकर,तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष गोवर्धन क्षीरसागर,धाराशिव- उस्मानाबाद तालुका उपाध्यक्ष मनोज लाडुळकर,कळंब तालुका संघटक किशोर पवार,विकास वाघमारे,अमोल सुरवसे,प्रशांत सुरवसे,बालाजी राऊत यांचे सह नाभिक समाज बांधव ऊपस्थीत होते.

  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हुतात्मा शाहीर लालासाहेब वाघमारे यांचे वंशज मा.दगडू शंकर वाघमारे तसेच हुतात्मा शाहीर लालासाहेब वाघमारे स्मारक समिती अध्यक्ष संतोष ताटे,सचिव सुनील वाघमारे,ऊत्सव समीती अध्यक्ष नवनाथ

वाघमारे,कार्याध्यक्ष दिपक डिगे,ऊपाध्यक्ष रवी पप्पु इंगळे,शिवशंकर दिलीप वाघमारे,सचिव अंकुश पवार,खजिनदार अविनाश ताटे,पथ्वीराज वाघमारे,दिलीप वाघमारे,अनिल वाघमारे,यांचे सह अनेक समाजबांधवानी परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *