दोन हजाराची नोट बंद होणार या बातम्यांमुळे लोकांनी विनाकारण गोंधळून जाऊ नये – प्रवीण अवचर

करमाळा प्रतिनिधी

आरबीआय ने काढलेल्या परिपत्रकानुसार 2000 च्या नोटा ताबडतोब बंद होणार नसून नोटांची छपाई बंद करण्यात आलेली आहे, म्हणजेच इथून पुढे, बँकेतून किंवा एटीएम मधून, दोन हजार रुपयांच्या नोटा मिळणार नाहीत, दुसरा महत्त्वाचा विषय

म्हणजे 23 मे ते 30 सप्टेंबर या पाच महिन्यांमध्ये या नोटा तुम्ही बाजारात वापरू शकता, व गरजेनुसार बँकेतून बदलून घेऊ शकता, तुम्हाला पाच महिन्यांमध्ये आपल्या जवळच्या बँकेमधून बदलून घ्यायचे आहेत, घाई गडबड करू नका किंवा

गोंधळून जाऊ नका, कारण तब्बल पाच महिन्यांनी म्हणजे 30 सप्टेंबर नंतर या नोटा बंद होणार आहेत किंवा पुढे आणखी मुदत वाढ मिळू शकते. सोशल मीडिया वरती फिरत असणाऱ्या चुकीच्या मेसेजेसमुळे लोकांमध्ये प्रचंड गोंधळ उडालेला

असूननोटा बदलण्यासाठी पूर्ण पाच महिन्याचा वेळ देण्यात आलेला असून बँकेतून तुम्ही प्रत्येकी दोन हजाराच्या दहा नोटा म्हणजेच एका वेळेला वीस हजार रुपये बदलून घेऊ शकता. तरी नागरिकांनी गोंधळून न जाता दिलेल्या वेळेमध्ये 2000 च्या नोटा बदलून घ्याव्यात असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अवचर यांनी केलेले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *