
मकाई निवडणुकीत आक्षेप घेतलेल्या अर्जांचा निकाल 22 मे रोजी
करमाळा प्रतिनिधी
तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दाखल झालेल्या बहुतांश अर्जावर अदिनाथचा अपूर्ण शेअर्स सलग तीन वर्ष ऊस गाळप नाही तीन आपत्य व थकीत असलेबाबतचा दाखल असे अक्षेप आले आहेत. मोहिते पाटील समर्थक

जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले, प्रा. रामदास झोळ, बाळासाहेब पांढरे, रामभाऊ हाके, सुभाष शिंदे बागल गटाचे काही समर्थकांबाबत आदींसह ३६ अर्जावर अक्षेप आले आहेत.

आक्षेपांवर आज सुनावणी झाली पण त्याचा निकाल हा राखून ठेवण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांनी सांगितले आहे. सदर निकाल 22 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून तहसील कार्यालयात

छाननीला सुरुवात झाली होती. सुरुवातीपासून सर्व गटाच्या हरकती ऐकून घेतल्यावर व त्यावर तीन वाजल्यापासून सुनावणी करण्यात आली. तर त्याकाळात सर्व उमेदवार तिथेच वाट पाहत होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांच्या सुनावण्या पूर्ण झाल्या निकाल मात्र राखून ठेवण्यात आला आहे.
