संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा उद्या सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालासमोर आत्मदहन करण्यात येईल – सिकंदर गणी सय्यद
करमाळा प्रतिनिधी
मी दि. 28/12/2022 च्या अर्जानुसार दि. 26 जानेवारी 2023 पासून आमरण उपोषणास बसणार असलेबाबत आपणास कळविले होते, परंतु उपविभागीय अधिकारी सो माढा विभाग कुर्डूवाडी तहसीलदार सो.करमाळा मुख्याधिकारी सो. करमाळा पोलीस निरीक्षक सो. करमाळा यांनी आपण प्रजासत्ताक दिनी उपोषण करू नये, आम्ही आपले काम करू असे आश्वासण

पत्राद्वारे दिले होते. सदर अर्जाची चौकशी करून तहसीलदार यांनी आदेश क्र.हनों/एसआर/01/2023 करमाळा, ता. करमाळा, गट नं. 377/1 मालमत्ता पत्रकाचे कमी जास्त पत्रक भूमी अभिलेख करमाळा यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर चालू 7/12 उतारेवरून रफिक महमंद सय्यद, गुलशन चाँदपाशा शेख, दौलत मंहमद सय्यद, शमा गफूर मुलाणी यांची नावे व त्यांचे

समोरील क्षेत्र कमी करून मालमत्ता पत्रकी नोंद असलेले सदर 7/12 बंद करण्यात यावा. असे आदेश तहसीलदार करमाळा यांनी 29/3/2023 रोजी दिले. वास्तविक पाहता मी दि. 29/7/2022 व 31/10/2022 तसेच 28/12/2022 रोजी पत्र देऊन प्रतिवादी रफिक महमद सय्यद व इतर 3 यांच्यावर रितसर चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केलेली

होती. परंतु तहसीलदार करमाळा यांनी 7/12 उताऱ्यावरून व त्यांचे समोरील क्षेत्र कमी करून मालमत्ता पत्र कि नोंद असलेले सदर 7/12 बंद करणेत यावा. असा आदेश दिला. परंतु सदर वादीवर आमच्या मागणीप्रमाणे गुन्हा दाखल केलेला नाही त्यामुळे वादीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा दि. 17/5/2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालासमोर आत्मदहन करण्यात येईल.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *