
१२ मे २०२३ रोजी जागतिक आरोग्य परिचारिका दिन साजरी
करमाळा प्रतिनिधी

दिनांक १२ मे २०२३ रोजी जागतिक आरोग्य परिचारिका दिना निमित्ताने अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा करमाळा यांच्या वतीने करमाळा येथील हृदयरोग तज्ञ डॉ. प्रमोद कांबळे व डॉ. कविता कांबळे यांच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये सदिच्छा भेट दिली. यावेळी हॉस्पिटलमधील परिचारिकांचा सन्मान करण्यात आला.

जागतिक आरोग्य परिचारिका दिना निमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा शाखेच्या वतीने करमाळा येथील डॉ प्रमोद कांबळे डॉ कविता कांबळे यांच्या हॉस्पिटलमधील परिचारिका माधुरी दळवी, वनिता नरुटे, सना तांबोळी, कल्पना

आव्हाड, ज्योती भोसले,जया भोसले, रतन गाडे, ज्योती दिवाण,शमा पठाण , माया कांबळे, प्रकाश कांबळे, सदाशिव कांबळे, तुषार शिंदे,अजय कांबळे, प्रवीण नरुटे, सद्दाम कुरेशी यांचा पेन (लेखणी) देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी करमाळा

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे करमाळा तालुकाध्यक्ष शशिकांत नरुटे, तालुका संघटक चक्रधर पाटील सर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या जिल्हा महिला आघाडी च्या प्रमुख माधुरी परदेशी, ललिता वांगडे, निशिगंधा शेंडे आदि पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
