
मकाई निवडणुकीत जास्तीत जास्त अर्ज दाखल करा-प्रा झोळ
करमाळा प्रतिनिधी,
मकाई सुरळीत करण्यासाठी आम्ही रिंगणात उतरलो आहोत. सत्ताधारी बागल गटाने सर्व शेतकर्यांची देणी दिली तर आम्ही हा कारखाना बिनविरोध करु, असे प्रतिपादन प्रा. रामदास झोळ यांनी केले.

या निवडणुकीत जास्तीत जास्त अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आम्हाला पाठींबा दिला असल्याचे त्यांनी पुन्हा एखदा सांगितले आहे.
मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणुक लढवण्यासाठी मकाई बचाव समिती रिंगणात उतरली आहे. याचे नियोजन करण्यासाठी प्रमुख पदाधिकार्यांची आज तातडीची बैठक झाली.

यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ, आदिनाथ बचाव समितीचे हरिदास डांगे, शाहाजी देशमुख, गोवर्धन चवरे, हनुमंत मांढरे पाटील, राजाभाऊ देशमुख, अंकुश केकाण, शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे,गफुरभाई शेख आदी उपस्थित होते.

या निवडणुकीत चांगल्या लोकांनी उतरावे. मकाईमध्ये बदल घडवण्यासाठी समविचारींनी एकत्र येण्याचे आवाहन करत यामध्ये सर्व राजकीय मंडळींनी प्रा. झोळ यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
चिवटे म्हणाले, या निवडणुकीत सक्षम संचालक देण्यासाठी आम्ही निवडणुकीत उतरत आहे. स्व. दिगंबरराव बागल यांनी स्थापन केलेला हा कारखाना त्यांच्या विचाराने चालला पाहिजे. जर शेतकर्यांची सर्व देणी सत्ताधार्यांनी दिली तर कारखाना

बिनविरोध करु, असे त्यांनी सांगितले आहे. निवडणुक बिनविरोध करणे हे आता सर्वस्वी बागल यांच्याच हातात आहे. जर सर्व पैसे दिले तर आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू असे चिवटे यांनी सांगितले आहे. मांढरे पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले आहे.
