प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालय, करमाळा येथे वाद विवाद स्पर्धा उत्साहात

करमाळा प्रतिनिधी  

करमाळा येथील प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र शासन, भारत पेट्रोलियम मुंबई व लक्ष्मी वैभव गॅस करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ६ मे रोजी इंधन बचत व संरक्षण या विषयावर वाद विवाद स्पर्धेचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम हा इंधन सुरक्षा सप्ताह निमित्त अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष या विभागाकडून आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कमलाई नगरी साप्ताहिक चे संपादक जयंत दळवी व लक्ष्मी वैभव गॅस एजन्सी चे प्रमुख वैभव शेंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण देशमुख अध्यक्ष म्हणून लाभले. या कार्यक्रमाची सुरुवात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, प्रतापसिंह मोहिते पाटील, राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली.

या वाद विवाद स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील एकूण बारा स्पर्धक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना जयंत दळवी म्हणाले की,  इंधनाची बचत ही स्वतःपासून करणे गरजेचे असून प्रत्येकाने देशाची संपत्ती जबाबदारीने वापरली पाहिजे. तसेच वैभव शेंडे म्हणाले की, नागरिकांमध्ये व प्रामुख्याने विद्यार्थी वर्गामध्ये इंधन संरक्षण या बद्दल अधिक जागरूकता निर्माण होण्यासाठी अश्या स्पर्धेचे आयोजन खूप गरजेचे आहे व आपली आवश्यक ती गरज ओळखून आपण इंधनाचा वापर केला पाहिजे अन्यथा येणारा काळ आपल्या देशाला अराजकातेकडे घेवून जाईल. या स्पर्धेमध्ये सहभागी

स्पर्धकांना लक्ष्मी वैभव गॅस एजन्सी तर्फे सोलर लॅम्प तसेच प्रथम विजेत्या संघाला ५००१/- रुपये व द्वितीय येणाऱ्या संघाला रुपये २१००/- रोख बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण देशमुख व्यक्त होताना म्हणाले की, इंधन बचत करताना आपल्याला इतर काही पर्याय शोधावे लागतील की त्यामधून आपल्याला प्रदूषण विरहित, स्वस्त व मुबलक इंधन निर्माण होईल व यासाठी विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी संशोधन करून पुढाकार घेणे गरजेचे आहे व शासन, समाजसेवी संस्थांनी त्यांच्या मागे उभे राहून प्रोत्साहन किंबहुना आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे. तसेच पद्मजादेवी

(आईसाहेब) मोहिते पाटील, सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर व महाविद्यालयाचे मार्गदर्शक संचालक डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनातून महाविद्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. भोसले डी. जी. यांनी केले तर आभार प्रा. ए. एस. चोपडे यांनी व्यक्त केले. तसेच परीक्षक म्हणून ग्रंथपाल प्रा. गायकवाड ए. व्ही. व वनस्पतीशास्त्र चे विभागप्रमुख प्रा. जाधव एस. एम. हे परीक्षक म्हणून लाभले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *