यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात इयत्ता 11 वी कला/वाणिज्य/विज्ञान वर्गाचा निकाल जाहीर

करमाळा प्रतिनिधी

विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथे ६ मे रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी व देशभक्त नामदेवराव जगताप यांची पुण्यतिथी साजरी करून महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहामध्ये इयत्ता 11 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष सन 2022-23 मधील कला/वाणिज्य/विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.

 कला शाखेत

 1) आवटे ऋतुजा आबासाहेब -92.67

2) शेख सुमय्या रियाज -89.17

3) शेख सना रियाज- 86.67% गुण मिळाले तर

 वाणिज्य शाखेमध्ये

1) जाधव आदेश तुकाराम- 96.50%

2) वासानी खुशी हेतल- 93.50

3) कुंभार ओंकार महावीर- 92.83% गुण मिळाले.

 विज्ञान शाखेतील

1) जगदाळे नम्रता बाळासाहेब -96.83%

2) गणेशकर प्रज्ञा विष्णू- 95.33

3) कुलांगे प्राप्ती संतोष- 94.00% गुण मिळाले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार विजयश्री सभागृहांमध्ये विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व पालक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना विलासरावजी घुमरे

सर यांनी सांगितले की, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थीनींनी व विद्यार्थ्यांना सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी अगदी कमी खर्चामध्ये वसतिगृहात राहण्याची व्यवस्था करण्यात येईल. तरी तालुक्यातील व ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात प्रयत्न केले जातील असे सांगितले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सांगितले की, करमाळा तालुक्यातील व ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन केले. तसेच प्रा. लक्ष्मण राख यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विजय वारुळे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. मुक्ता काटवटे यांनी केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांपैकी ऋतुजा आवटे, नम्रता जगदाळे व कुलांगे प्राप्ती यांनी आपले महाविद्यालयाविषयीचे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आभार प्रा.पोपट कुदळे यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *