
पुनर्वसन विभागातील मंजूर कामे तात्काळ पूर्ण करा अन्यथा बेमुदत उपोषण करनार – बिटरगाव ग्रामस्थांचा इशारा
करमाळा प्रतिनिधी
पुनर्वसन विभागाकडून २०१८-१९ मध्ये मंजूर झालेली कामे संबंधित ठेकेदाराकडून अद्याप पर्यंत सुरू करण्यात आली नाहीत. त्यामुळे १० मे २०२३ रोजी बिटरगाव (वांगी) येथील ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ यांच्या वतीने तहसील कार्यालय करमाळा येथे बेमुदत उपोषणास करनार असल्याचे निवेदन ग्रामपंचायत बिटरगाव (वांगी) यांच्या वतीने तहसील कार्यालय करमाळा यांना देण्यात आले.

सदर निवेदना म्हटले आहे की, सन २०१८/१९ साली पुनर्वसन विभाअंतर्गत स्मशानभूमीत,सिमेंट काँक्रीट रस्ता, गटार, शाळा कंपाऊंड अशी अंदाजे ७६ लाखाची कामे एम. एस. पद्मावती कन्स्ट्रक्शन, शेटफळ गढे ता. इंदापूर यांना मिळाली आहेत. परंतु ठेकेदारांने अद्यापपर्यंत गावामध्ये एकही काम सुरू केले नाही. काम सुरू करण्याबाबत वारंवार विनंती केली. तरीही काम सुरु

करण्यात आले नाही. याबाबत पुनर्वसन विभाग करमाळा यांच्या कडे तक्रार करण्यात आली. परंतू पुनर्वसन विभागाकडून तक्रारीची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे समस्त ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर निवेदना च्या प्रति मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस निरीक्षक करमाळा, कार्यकारी अभियंता उजनी धरण, गटविकास अधिकारी पंचायत समिती करमाळा यांना देण्यात आल्या आहेत.
