महिलांची गर्भाशय मुखाची कर्करोग तपासणी शिबिर संपन्न
ओम महिला मंडळ करमाळा व जिजाऊ ब्रिगेड जेऊर यांच्या वतीने गर्भाशय मुख कर्करोग ची तपासणी मशीन द्वारे शिबिरांत करण्यात आली.
महानायिकांच्या प्रतिमा पूजनाने शिबिराचे उद्घाटन झाले.
सदर शिबिरात जेऊर व आसपासच्या खेड्यातील बेचाळीस महिलांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एडव्होकेट शहानूर सय्यद होत्या.
मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की ओम महिला मंडळ करमाळा यांनी हे शिबिर घेऊन महिलांची जनजागृती केली. अशा महिला मंडळांनी महिलांसाठी असे उपक्रम राबवून महिलांचे आरोग्य किती महत्त्वाचे असते हे पटवून दिले.
स्त्री रोग तज्ञ डॉ कविता का़बळे म्हणाल्या की गर्भाशय मुख कर्करोगासाठी भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
ही गोष्ट दुर्दैवी आहे.आणी या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी ओम महिला मंडळाने ही साडेतीन हजारांची तपासणी अगदी मोफत ठेवली.
तसेच लवकर तपासणी केली तर यातून आपण वाचू शकतो असे कविता कांबळे यांनी प्रतिपादन केले.
हा रोग कसा होतो व यावर उपचार या संदर्भात महिलांनी डॉ शी संवाद साधला.तसेच या संदर्भात डॉ कांबळे यांनी सखोल माहिती दिली.
मंडळाच्या अध्यक्षा अंजली राठोड श्रीवास्तव म्हणाल्या की ही तपासणी महिलांनी दर तीन वर्षांनी करणे गरजेचे आहे.
तसेच याची लक्षणे कारणे व उपायावर ही मार्गदर्शन केले.
डॉ कविता कांबळे यांच्या हॉस्पिटलमध्ये युवती साठी ही लस १० मे रोजी उपलब्ध असेल असे ही मत श्रीवास्तव यांनी मांडले .
प्रमुख उपस्थितीत सौ प्रियंका खटके, डॉ येवले व जिजाऊ ब्रिगेड च्या पदाधिकारी महिला होत्या.
सदर कार्यक्रमासाठी मा.नितिन खटके व त्यांच्या सहकारी मित्रांनी
सदर शिबिरास मोलाचे सहकार्य केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती पांढरे यांनी केले व आभार जयश्री वीर यांनी मानले.