देशात राज्यात सत्ता परिवर्तनाची सुरुवात झाली असून काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आल्याने आणि कार्यकर्त्यांनी या संधीचा फायदा घेऊन कामाला लागावे – आमदार रवींद्र धंगेकर

करमाळा प्रतिनिधी

देशात राज्यात सध्या सत्ता परिवर्तनाची सुरुवात झाली असून काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आल्याने बदलाची सुरुवात कसब्यातुन सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांनी या संधीचा फायदा घेऊन कामाला लागावे असे आवाहन कसबा पेठचे पुणेचे आमदार विकास धंगेकर यांनी व्यक्त केले. काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे

जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, बाजार समितीचे सभापती शिवाजी बनगर, उपसभापती चिंतामणी जगताप, प्रा. रामदास झोळ, राजाभाऊ देशमुख, माजी नगरसेवक राहुल जगताप, अभिषेक आव्हाड, जामखेडचे काँग्रेस तालुका अध्यक्ष शहाजीराजे भोसले, जिल्हा संघटक हरिभाऊ मंगवडे, शहराध्यक्ष सुजय जगताप, ओबीसी तालुका अध्यक्ष गफुर शेख, संभाजी ब्रिगेडचे नितीन, आदी उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी उपसभापती चिंतामणी जगताप,

प्रा. रामदास झोळ, राजाभाऊ देशमुख, शहाजीराजे भोसले, प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रतापराव जगताप यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकनेता होण्यासाठी जनतेच्या मनामध्ये आपले स्थान घट्ट करून लोकनेता होण्यासाठी जनतेमध्ये जाऊन काम करा जनता तुम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून आमदार केल्याशिवाय राहणार नाही, असे मत कसबा पुणेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले.

करमाळा येथे काँग्रेस आय करमाळा तालुका काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेसचे अध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या वाढदिवसाच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, मी एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला असून जनतेचे काम करत लोकांच्या हृदयामध्ये आपण स्थान निर्माण केले आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता ते उमेदवार यशस्वी प्रवास केला आहे. काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष असेल, देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी त्याचे मोठे बलिदान आहे. देश उभा करण्यासाठी त्यागाची परंपरा असलेला पक्ष असून या पक्षाने सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून राजकारण केलेले आहे. सर्वसामान्यांचे भले करण्याचे ताकद काँग्रेसमध्ये असून जनतेच्या मनामध्ये भाजप विषयी प्रचंड चीचिड आहे. भाजप सरकारने हे घोषणांचे सरकार असुन सर्वसामान्य जनतेला महागाईच्या लोटण्याचे काम या सरकारने केलेले आहे. शेतकरी सर्वसामान्य जनता मराठा आरक्षणाचे प्रश्न, ओबीसी वर्ग यांचे प्रश्न या सर्व प्रश्नांची उत्तरे या सरकारकडे नाहीत. त्यामुळे संपूर्ण देशांमध्ये काँग्रेसला वाढता जनाधार मिळत असून बदलाची वारी संपूर्ण देशभर पाहणारा असल्याचे चित्र सध्या दिसत असून बदलाची सुरुवात कसबा पुणे येथून झाली असून याच्या 2024 आघाडीचे सरकार राज्यात तसेच केंद्रातही काँग्रेसला बहुमत मिळणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्या संधीचा आपण फायदा उठून सर्वसर्वसामान्य जनतेचे काम करा, जनता तुमच्या कामाची पावती देईल माझे स्वतःचे उदाहरण आपल्यासमोर आहे. तरी येत्या काळामध्ये कार्यकर्त्यांनी आळस झटकून कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन नितीन चोपडे यांनी केले तर आभार माजी नगरसेवक राहुल जगताप यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *