
शिव-फुले-शाहू-आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने सोलापूर पॅटर्न पद्धतीने आंबेडकर जयंती उत्सहात साजरी
करमाळा प्रतिनिधी
शिव-फुले-शाहू-आंबेडकर जयंती उत्सव समितीचे संस्थापक नागेश दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव विविध भरगंध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.

या जयंती उत्सवामध्ये बुद्धिबळ स्पर्धा, भारतीय संविधान व लोकशाहीचे भविष्य धोक्यात आहे का? या विषयावर श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान, भव्य खुल्या राज्यस्तरीय डान्स स्पर्धा आणि मुख्य जयंती दिवशी 14 एप्रिल रोजी भव्य आकर्षक देखाव्यासह मिरवणूक काढण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंबेडकर स्मारक ते भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती. वरील सर्व कार्यक्रमांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. या वर्षी जयंती उत्सव समितीचे संस्थापक नागेश कांबळे यांनी सर्व बहुजनांना सोबत घेत जयंती उत्सव साजरा केला.

नागेश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामीण भागातूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. मिरवणुकीत अण्णाभाऊ साठे नगर …हिंदूखाटीक – मारवाड गल्ली – राखुंडे गल्ली – सावंत गल्ली या सर्वांनी आपापल्या गल्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन नागेश कांबळे यांच्या हस्ते केले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ही एक परिवर्तनाची नांदी सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली होती.

सोलापूर पॅटर्नची करमाळ्यातील जनक ठरलेले नागेश कांबळे यांनी गेली दोन वर्षापासून करमाळ्यात सुरुवात केली. पहिल्या वर्षी दोन तर दुसऱ्या वर्षी पाच मंडळ या जयंती उत्सवात सहभागी झाले. यामुळे तर जयंती उत्सावात मोठी भर पडल्याने विविध कार्यक्रम राबविले जावेत आणि त्याचा लाभ सर्व गरजवंतांना मिळावा ही माझी भावना आहे असे नागेश कांबळे म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी सोलापूर पॅटर्न पद्धतीने जयंती साजरी करण्याचे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सहभागी झालेल्या मंडळाचे त्यांनी आभार मानले.
यानंतर डीजे च्या तालावर फिरकणारी हजारो कार्यकर्ते महिला-पुरुष मोठ्या जल्लोषात व उत्साहात मिरवणुकीत सहभागी झाले होते. या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले व मार्गदर्शक दीपकराव ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशपाल कांबळे, दत्ता बडेकर, नामदेव वाघमारे या शिव-फुले-शाहू-आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पोलीस बांधवांचाही सत्कार नागेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व स्तरावरून नागेश कांबळे यांचे कौतुक व शुभेच्छा देत आहेत.
गतवर्षी 83000 तर यावर्षी 150000 रुपयांचे योगदान नागेश कांबळे यांनी शिव-फुले-शाहू-आंबेडकर जयंती उत्सव समितीकडे वर्गणी म्हणून जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले व मार्गदर्शक दीपकराव ओहोळ, यशपाल कांबळे, प्रफुल्ल दामोदरे, भीमराव कांबळे सर, दत्ता बडेकर, नामदेव वाघमारे, बाळू कांबळे, प्रमोद गायकवाड, मयूर कांबळे, पप्पू मोहोळ, जितेश भोसले, गणेश जाधव, सुनील खरात, दिलीप चाचा कांबळे, कालिदास पवार अशा टीम कडे सुपुर्द केले.