
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न
करमाळा प्रतिनिधी
सालाबादाप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मु. पो. आवाटी, ता. करमाळा, जि. सोलापूर येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती भारिपचे देवा (अण्णा) लोंढे, आवाटी गावचे सरपंच शाबीर भाई शेख, आवाटी सोसायटीचे चेअरमन राजू भाई खान, डीसीसी बँकेचे माजी संचालक नसरुल्ला खान उपस्थित होते.

आवाटी गावात प्रमुख रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. मिरवणुकीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रमुख पाहुण्यांनी हार घालून बुद्ध वंदना घेतली.

यावेळी बोलताना भारीपचे देवा लोंढे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, बाबासाहेबांनी सांगितल्या प्रमाणे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा याप्रमाणे बहुजन समाजाने प्रगती करावी. आवाटी गावामध्ये सर्व धर्मीयांच्या वतीने आंबेडकर जयंती साजरा करण्यात आली, त्याबद्दल सर्व बहुजनांचे आभार मानले.
यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला. हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी प्रबुद्ध ग्रुपचे शंकर गायकवाड, महाडिक गायकवाड, भास्कर गायकवाड, दादा गायकवाड, दिलीप गायकवाड, राहुल गायकवाड, बाळा गायकवाड, शरद गायकवाड, अमोल गायकवाड, अमित गायकवाड, रोहिदास गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
भारीपचे देवा लोंढे, सरपंच जावेद शेख, काका पाटील नेर्ले, ग्रामपंचायत सदस्य तनवीर शेख, बंडू पाटील, प्रकाश गायकवाड उपस्थित होते.