कुगाव गावामध्ये बांधकाम कामगार नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार
कुगाव गावामध्ये बांधकाम कामगार नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. कामगारांना लागणारे साहित्य वाटप करण्यात आले आहे. सर्व संघटित बांधकाम कामगार व मजूर यांना मध्य भोजन चालू झाले आहे. जेवणाचा लाभ सर्व बांधकाम कामगार व इतर गोरगरीब ही घेत आहे. कामगार आयुक्त प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. अजून कोणी वंचित कामगार वर्ग राहिला असेल तर त्यांनी या लवकरात लवकर या शासकीय बांधकाम कामगारांची नोंदणी करावी व या शासनाच्या गोष्टीचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे. संपर्क क्रमांक : 9860057183
सर्व कामकाज लक्ष्मीताई पोळ यांनी पुढाकार घेऊन केले आहे. तरी त्यांनी असेही म्हटले आहे की, कामगारांना घरे देण्यासाठी राज्य सरकार तर्फे प्रयत्न सुरू झाले असून घरे बांधण्यासाठी मोकळ्या शासकीय जमिनीची माहिती दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय यांना दिले आहे. यासाठी विकास कामाचे सहकार्य घेतले जाणार आहे तसेच नोंदणीकृत कामगारांना पंतप्रधान आवास योजना अंतर्गत 2.75 लाख तर कामगार मंत्रालयातर्क २ लाख रुपये असे एकूण ४.७५ लाख रुपये निधी कामगार मंत्री सुरेश काळे यांनी दिल्याने सर्व कामगारांना या सर्व लाभ मिळवून देईन असे लक्ष्मीताई पोळ यांनी म्हटले आहे आणि आज मध्य भोजन चालू केले आहे. यावेळी उपस्थिती कौशल्या कामटे सरपंच, धनंजय डोंगरे आदिनाथ कारखाना चेअरमन, महादेव कामटे विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन, युन्नस सय्यद माजी उपसरपंच, कैलास बैरे, सागर पोरे, गौतम बैरे, मोहन कांबळे, काशिनाथ पोळ, अमोल गाडे, मीनाक्षी कामटे, रूपाली शिंदे, रझी पोळ, लझी कांबळे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *