
आकाश सुरवसे या युवकाची पोलीस दलामध्ये भरती झाल्याबद्दल दिग्विजयजी बागल यांच्या शुभहस्ते सत्कार संपन्न
करमाळा प्रतिनिधी,
आकाश ज्ञानदेव सुरवसे राहणार मिरगव्हाण तालुका करमाळा या युवकाची पोलीस भरती प्रक्रियेद्वारे थेट पोलीस दलामध्ये भरती झाल्याबद्दल मकाई सहकारी साखर कारखान्याचे युवा चेअरमन दिग्विजयजी बागल यांच्या शुभहस्ते बागल

निवासस्थानी आज विशेष सत्कार संपन्न करण्यात आला. यावेळी आदिनाथचे संचालक नामदेव भोगे, रवी शेळके, भारत पवार आणि आकाश सुरवसे यांचे वडील ज्ञानदेव सुरवसे हे प्रामुख्याने उपस्थित होते. या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या संचालिका व बागल गटाच्या नेत्या रश्मी दीदी बागल यांनी मोबाईलवरून आकाश सुरवसे यांचे विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत. आकाश सुरवसे यांनी ग्रामीण भागातून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून हे यश मिळवल्याबद्दल

रश्मी दिदी बागल यांनी कौतुक करून सुरवसे यांनी आपली पोलीस दलातील सेवा प्रामाणिकपणे व कर्तव्यनिष्ठ पद्धतीने बजावावी व करमाळा तालुक्याचा लौकिक वाढवावा अशा शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील युवक आणि विद्यार्थी राज्यसेवा परीक्षा व पोलीस दलातील परीक्षा पास होऊन पुढे आपलं चांगलं करिअर घडवत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
