गर्भाशयाच्या कॅन्सर मुळे राज्यात दरवर्षी 70 हजार महिला मृत्यूमुखी पडतात, उपाय योजना करणे काळाची गरज –डॉ. श्रद्धा जवंजाळ

करमाळा प्रतिनिधी

गर्भाशयाचा कॅन्सर हा मोठा आजार सध्या महिलांमध्ये दिसून येत असून याला प्रतिबंध करणारी लस उपलब्ध असून ही लस घेतली तर 99 टक्के महिला या आजारापासून दूर राहू शकते. त्यासाठी या लसीकरणाची गरज आहे असे मत गर्भाशयाच्या कॅन्सरवर संपूर्ण देशात जनजागृती करणारे डॉ. श्रद्धा जवंजाळ यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ पत्रकार नरसिंह चिवटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गर्भाशयाच्या कॅन्सरवर प्रतिबंध करणाऱ्या लस इच्छुक असणाऱ्या महिलांची नोंदणी करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.

270 महिलांनी यात नोंदणी केल्या. या महिलांना पुढील महिन्यात लस देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचे कार्यकारी प्रमुख मंगेश चिवटे, डॉ. कविता कांबळे, शिवसेना महिला आघाडी तालुकाध्यक्ष प्रियंका गायकवाड, आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. श्रद्धा म्हणाल्या की, राज्यात दरवर्षी 70 हजार महिला गर्भाशयाचे कॅन्सर मुळे मृत्यूमुखी पडतात. प्रतिबंध करणारी लस आहे. विशेषतः सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक स्त्रियांनी तरुणींनी ही लस घेणे गरजेचे आहे.

प्रतिबंधक लसची किंमत चार हजार रुपये आहे. लस या शिबिरात मोफत देण्यात येत आहे. करमाळा शहरातील तालुक्यातील महिलांनी या संदर्भात सजग राहून महिलांमध्ये जागृती करून जास्तीत जास्त महिलांची लस घेण्यासाठी नोंदणी करावी. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अनेक उपक्रम घेऊन आरोग्याच्या संदर्भात दक्ष आहेत. बार्शी येथील नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे मोफत कॅन्सर वरचे उपचार केले जातात. फक्त लोकांना माहिती नसल्यामुळे सेवा मिळत नाही. यामुळे सर्वांनी यासाठी प्रयत्न करावेत. विशेषता कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींनी ही लस घेणे अत्यंत गरजेचे आहे. करमाळ्यातील अकरावीतील मुलगी अमृता लावंड तिने जवळपास 62 महिलांना प्रबोधन करून ही लस घेण्यास प्रवृत्त केले व त्यांची नाव नोंदणी केली. या तिच्या उपक्रमाबद्दल  बद्दल डॉ. श्रद्धा  जवंजाळ यांनी तिचा सत्कार केला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *