
वृद्ध महिलेस नातेवाईकांनी दिले टाकुन;भिम.आर्मी आली मदतीला
करमाळा प्रतिनिधी
सध्या माणुसकी , प्रेम,माया ,अपुलकी, आई , वडील, मुले अशी रक्ताची नाती आता लोप पावत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. दिवसेंदिवस यात सतत वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशाही कलियुगातील दुनियात माणुसकीची जखमेवर फुकंर मारणारे ही पुढे येताना आपल्याला समोर पहायला मिळत आहेत. अशाच एक नवीन प्रकरण लोकांच्या निदर्शनास आले आहे. गेल्या दोन दिवसापासुन एका साधारण ऐंशी वर्षीय
वृद्ध महिलेस नातेवाईकांनी चक्क मोठ्या चारचाकी वाहनातुन जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारात टाकुन पोबारा केला आहे. निराधार अवस्थेत या वृध्द महिलेला जिवंतपणीच मरणयातना भोगताना पाहुन प्रत्येकाचे मन हेलावताना दिसत आहे. याबाबतची माहिती

भिम आर्मीचे अध्यक्ष उत्तरेश्वर काबंळे यांना मिळाली.तात्काळ भिम आर्मी चे पदाधिकारी शिवाजी काबंळे, सुखदेव गरड आदि वृध्देच्या मदतीला धावून आले. तोपर्यंत माणुसकी दाखवत आरोग्य केंद्रातील महिला कर्मचारी आरोग्यसेविका प्रतिभा भोसले, निलम गवळी, श्रीमती शेळके ,श्रीमती गायकवाड आदि महिला कर्मचा-यानी त्या वृध्देस मदत करत तात्पुरत्या निवा-याची सोय करून विचारपुस केली.ती जेऊर येथील असल्याचेच बोलत असल्याने तीला इतर माहिती देऊ नये अशी दमबाजी संबंधितांनी दिली असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटवर सदर वयोवृद्ध महिलेला कोणीतरी रात्रीच्या वेळेस सोडून गेलेने याची नक्की माहिती मिळत नाही. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले की त्या गेल्या आठ दिवसांपासून ही वृध्दा येथेच असुन त्यांना जेवण- पाणी पुरवले जात आहे .भीम आर्मीच्या सहकाऱ्यांनी त्यांना जेवण नाष्टा देऊन त्यांची विचारपूस केली तिचे नाव बायडाबाई जाधव असे असल्याचे ती सांगत आहे . तिच्या म्हणण्यानुसार त्यांना कोणी जवळचे नातेवाईक नाहीत. भीम आर्मीने समाज माध्यमातून तिच्या नातेवाईकांना आवाहन केले आहे. ताबडतोब या वृध्द आजींना घरी घेऊन जावे. त्यांना उठता येत नाही. या वयात त्यांना आधाराची खूप गरज आहे. जर नातेवाईक असताना कोणी पुढे नसतील तर वेगळा पवित्रा भिम आर्मी ला घ्यावा लागेल. तोपर्यंत कोणी नातेवाईक पुढे न आल्यास दोन दिवसांत तिला वृध्दाश्रमात नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे भिम आर्मी चे उत्तरेश्वर काबंळे यांनी सांगितले.

……
गेल्या दोन तीन आठवड्यापासून ही वृध्दा येथे आहे. तिचे अद्याप कोणी नातेवाईक जवळ नसल्याने ठोस उपचार करता येत नाही.सध्या प्रकृती ठिक असली तरी उपासमारीने प्रकृती खालावल्याचे दिसते.त्यामुळे नातेवाईकांनी तात्काळ संपर्क करणे गरजेचे आहे.
…रत्नदिप टोपे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, जेऊर
……
अज्ञात लोकांनी या वयोवृद्ध महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारात अक्षरशः टाकून दिले होते. सदरची महिला चालुही शकत नाही. अशा वेळी आरोग्य केंद्रातील महिला कर्मचा-यांनी माणुसकी दाखवत भर पावसात तिला जागा देऊन तात्पुरती निवारा करून सोय करून जेवण दिले आहे .भिम आर्मी च्या पदाधिका-यांना ही माहिती मिळाल्यानंतर भिम आर्मी तिच्या नातेवाईकांचा शोध घेत आहे.नातेवाईक न मिळाल्यास या वृध्देला वृध्दाश्रमात नेण्यासाठी प्रयत्न करत आहे.
…उत्तरेश्वर काबंळे, अध्यक्ष, भिम आर्मी ,करमाळा
