
सध्याचे सरकार जनहितार्थ नाही -धवलसिंह मोहिते पाटील
करमाळा प्रतिनिधी
सध्याचे सरकार मात्र हुकुमशाही प्रवृत्तीचे आहे. इंग्रजांच्या नीतीने काम करणारे सरकार आहे. फोडा आणि राज्य करा, असे धोरण मोदी सरकार राबवत आहे सरकार जनहितार्थ नाही असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी केले. अवकाळीने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यायची सोडून सरकार आयोध्येला गेले होते, अशी टीका राज्य सरकारवर केली.

ते मंगळवारी करमाळ्यात तहसील परिसरात तालुकाध्यक्ष प्रताप जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या माध्यमातून जय भारत सत्याग्रह आंदोलन केले. यावेळी डॉ. मोहिते-पाटील बोलत होते. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मोहिते पाटील म्हणाले, खासदार राहुल गांधींनी संसदेत प्रश्न विचारल्यावर त्यांच्या लक्षात आले गांधी हे जनतेला जागे करण्याचे काम करत आहेत त्यामुळे त्यांचे पद घालवले. मोदी सरकार भुलथापा देऊन सत्तेतर आलेले सरकार आहे.

महागाई मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसतेय. कर वाढवले आहेत. आधी दुधावर कर नव्हता. आता दुधावरही कर लावण्याचे काम केले आहे. महागाई व इतर मुद्दे असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम सरकार करीत आहे. काँग्रेसचे युवक नेतृत्वच भविष्य घडवणार आहे. प्रत्येकाने राजकारणात सक्रिय होऊन येऊ घातलेल्या निवडणुका लढा व जिंका. ज्यांना संधी मिळणार नाही त्यांनी काँग्रेसकडे आम्ही संधी देऊ. यावेळी तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, जिल्हा

उपाध्यक्ष राधाकृष्ण पाटील, शिवसेना तालुका अध्यक्ष ठाकरे गट सुधाकर लावंड, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष वारे, शिवसेना शहर प्रवीण कटारीया, संजय शिंदे, संतोष गाणबोटे, शंभूराजे फरतडे, अभिषेक आव्हाड,सुजय जगताप, समीर हलवाई, कुमार माने, सचिन काळे, राजकुमार देशमुख, गफुरभाई शेख,आनंद झोळ, जावेदभाई मुलाणी, दस्तगीर शेख, संभाजी शिंदे, धर्मराज शिंदे, दादा कुदळे, समाधान काळे,मोहिते पाटील समर्थक मंगवडे,अभिजीत भालेराव,महम्मद कुरेशी,नितीन चोपडे,गणेश फलफले,बबलु चिंचकर,अशोक घरबुडे, आदिसह उपस्थितित होते.