
जेऊर येथे संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
जेऊर प्रतिनिधी
जेऊर येथे संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची 196 वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. यावेळी पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन चारित्र्यावरील विचार मांडले. यावेळी बोलताना नितीन खटके म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे फार मोठे समाज क्रांतिकार होते. महात्मा फुले यांचे सामान्य माणसावर प्रेम होते. आपले सारे जीवन या महापुरुषाने वंचितांसाठी वाहिले. या

देशातील दिन दुबळ्यांसाठी आपले अवघे जीवन देणाऱ्या ज्योतिराव फुले या महापुरुषाला महात्मा या पदवीने गौरवण्यात येत आहे. हजारोंचा जनसमुदाय उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करू लागला. त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रुनी अवघा परिसर धन्य झाला व अज्ञानाच्या अंध कारातून ज्ञानाचा तेजस्वी प्रकाश दाखवा गरीब अस्पृश्य शोषित पीडित दिन दुबळ्या बहुजन

समाजातील जनतेमध्ये क्रांतीची ज्वाला पेटवून अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची प्रेरणा देऊन त्यांच्या मनात जागृत करणार बहुजन ग्रामीण गरीब शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याय विरुद्ध आवाज उठवुन त्यांच्यामधील अंधश्रद्धा व अज्ञान दूर करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी इत्यादी ग्रंथ लिहिणारे तसेच शोधून त्यांच्या जीवनावर पोवाडा रचून सर्व प्रथम शिवजयंतीची सुरुवात केली. असे त्यांनी सत्यशोधक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर विचार मांडले. यावेळी उपस्थित

संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके, बालाजी गावडे, राकेश पाटील, अतुल निर्मळ, आदिनाथ माने, विश्वनाथ सुरवसे, रणजीत कांबळे, निलेश पाटील, अभिजीत म्हमाणे, सोमा माने, सागर बनकर, हेमंत शिंदे, अजित उपादे, डॉक्टर हुंबे, औदुंबर वाशिंबेकर, राजू घाडगे, शिव म्हमाणे, पिंटू जाधव, भाग्यवंत पोळ, रमेश लगस, अमर साळवे, वैभव मोहिते, सुहास शिंदे, अमोल गुंड, मैत्रय सुरवसे, पराग मोरे, विकास माने, किरण माने, आकाश माने, अजित चांदणे, सुरज गरड, बाळासाहेब गरड, इत्यादी उपस्थित होते.
