प्रा. रामदास झोळ सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रा. रामदास झोळ फॉउंडेशन ने 5 मुलींना शैक्षणिकरित्या दत्तक घेतले

सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविणारे वाशिंबे, ता. करमाळा येथील सुपुत्र व भिगवण येथील माळरानावर शिक्षणाची ज्ञानगंगा फुलविणारे दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांचा वाढदिवस मंगळवार दि. ११ एप्रिल २०२३ रोजी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

सदर वाढदिवस अभिष्टचिंतनाचे औचित्य साधून दतकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व प्रा. रामदास झोळ सर फाऊंडेशनचे डायरेक्टर राणादादा सूर्यवंशी साहेब यांच्या संकल्पनेतुन प्रा. रामदास झोळ सर यांच्या वाढदिवसाची सुरुवात संस्थेच्या परिसरात विविध प्रकारच्या रोपट्यांचे वृक्षारोपण करुन साजरा करण्याचे ठरविलेले असल्याने सकाळी संस्थेच्या सर्व

कर्मचाऱ्यांसमवेत प्रा. झोळ सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच वृक्षारोपण केलेल्या झाडांचे आपल्या मुलांसारखे संगोपन करण्याचे आवाहन राणादादा यांनी सर्वाना केले. तसेच प्रा. रामदास झोळ सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रा. रामदास झोळ फॉउंडेशन ने पाच गरजू व मुलींना शैक्षणिकरित्या दत्तक घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *