
राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय रावगाव येथे महात्मा ज्योतीबा फुले जयंती उत्सव साजरा
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंती उत्सव रावगाव येथे राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयात कांदवली मुंबई येथील कार्यरत पीएसआय प्रवीण बुधवंत साहेब यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार

अर्पण करून करण्यात आला ,या कार्यक्रमाप्रसंगी ग्रंथालयात असणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले, या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावगाव चे मुख्याध्यापक बहिरू गबाले ,महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथील सहशिक्षक भाऊसाहेब बुधवंत, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष शहाजी शिंदे,

सामाजिक कार्यकर्ते एजाज अंगारशा,अरोग्य उपकेंद्र रावगाव येथील अरोग्य सेवक डॉ. डोळस ,लक्ष्मण फुंदे ,राहुल पवार, प्रकाश कांबळे, पोपट बुधवंत, लक्ष्मण पवार ,दादा पवार, आदी उपस्थित होते सर्व उपस्थित आमचे आभार वाचनालयाचे सचिव भास्कर पवार यांनी मांनले.
