
ग्रामीण भागातून ही छोटे छोटे व्यावसायिक आज आत्म निर्भर होत असल्याचे मत नरेंद्रसिंह ठाकुर यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्पादक, प्रक्रिया उद्योग, सेवा उद्योग, व्यापार छोटे व्यवसायिक, फिरते विक्रेते यांच्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना (पीएमएमवाय) सुरू केली आहे. या अंतर्गत लोकांना आपला उद्योग (व्यवसाय) सुरु करण्यासाठी छोट्या रक्कमेचे कर्ज दिले जाते.
प्रधानमंत्री मुद्रा योजना 8 एप्रिल 2015 मध्ये सुरू करण्यात आली. आज या योजनेला 8 वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे ग्रामीण भागातून ही छोटे छोटे व्यावसायिक आज आत्म निर्भर होत असल्याचे मत नरेंद्रसिंह ठाकुर यांनी व्यक्त केले.

मुद्रा बँकेद्वारे छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांना कर्ज दिले जाते. ज्यांना नवा उद्योग, सुरु करायचे असेल, त्यांनाही कर्ज मिळते. त्याच बरोबर भाजीवाले, सलून, फेरीवाले, चहाचे दुकानदार यांनाही लोन दिले जाते. पंतप्रधान मुद्रा योजनेत प्रत्येक सेक्टर नुसार स्कीम बनवली आहे.
याचे सर्वसाधारण 3 स्तर करण्यात आलेले आहे. शिशु, किशोर व तरुण शिशु साठी 50,000 पर्यंत मर्यादा, तसेच किशोर साठी पन्नास हजार ते पाच लाख पर्यंत ची मर्यादा व तरुण साठी पाच ते दहा लाख रुपये पर्यंतची कर्ज मर्यादा ठरवले असून झिरो टक्के भांडवलावर नवीन व्यवसाय किंवा सुरू केलेले व्यवसाय वाढवण्यासाठी योजना कार्यरत आहे. यासाठी कोणत्याही जामीनदाराची किंवा तारण देण्याची आवश्यकता नाही. व्याजदराबाबत भारतीय रिझर्व बॅंकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व्याजदराचे दर ठरतात.

तसेच यामध्ये नावीन्यपूर्ण योजना मुद्रा कार्ड ही योजनाही कार्यरत आहे यामध्ये सी. सी. किंवा ओ. डी. ही सुविधा उपलब्ध आहे. मुद्रा लोन साठी ऑनलाईन ही Mahamudra.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करून बँकेत दाखल करू शकता.
प्रधानमंत्री मुद्रा योजना च्या माध्यमातून आतापर्यंत 23 लाख कोटी रुपये पासून 40 कोटी 82 लाख पेक्षा जास्त कर्ज स्वीकारले गेले आहे. एकूण कर्जापैकी 21% कर्ज नवीन उद्योजकांचे स्वीकृत केले गेले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पकतेतून प्रत्येक नागरिकांना झिरो बॅलन्स वर खाते उघडण्यासाठी प्रवृत्त केले याचा लाभ म्हणजे भारतातील अनेक योजना, शिष्यवृत्ती यांच्या रकमा लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होऊ लागल्या या पारदर्शक पणामुळे जनता समाधानी आहे..