
वादळी वाऱ्यामुळे, पावसामुळे मोठे नुकसान
करमाळा प्रतिनिधी
जामखेड रोड सावंत वस्ती येथे काल रात्री झालेल्या वादळात घराचे पत्रे उडाले यामध्ये एक मुलगी सायली परशुराम शिंदे व त्याच्या वडीलांना (परशुराम शिंदे) दुखापत झाली आहे. घटना स्थळी तातडीने जाऊन अभीजीत सावंत यांनी जखमीना तातडीने दवाखान्यात नेले जखमीची तब्येत आता व्यवस्थित आहे. तसेच शहरातील व तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वारा, वीजेचा कडकडाट, पावसाच्या गारा पडल्या होत्या. यामुळे अनेक ठिकाणी शेतकर्यांचे तसेच नागरीकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे.


