शेतकरी राजाला वाचविण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमोर मांडले ठाण. काम चालु झाल्यावरच सोडले कार्यालय

करमाळा प्रतिनिधी

आज करमाळ्यातील शेतकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आ. संजयमामा शिंदे यांनी डायरेक्ट विभागिय रेल्वे कार्यालय, सोलापुर येथे जाऊन अधिकाऱ्यांसमोर ठाण मांडले. अखेर प्रश्नाची तातडीने सोडवणुक करुनच ते परतले. करमाळा तालुक्यातील दिवेगव्हाण आणि राजुरी येथील काही शेतकऱ्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांचेकडे रेल्वेचे मनमानी कारभारामुळे तक्रार केली होती, त्या ठिकाणी रेल्वेचे कॉन्ट्रक्टरनी शेतकर्‍यांना न कळवताच ३५ शेतकर्‍यांची

पाइपलाइन फोडली होती व ते जोडण्यास सहकार्यही दिले जात नव्हते. तब्बल दीड ते दोन महिन्यां पासुन शेतीचे पाणी बंद झाल्यामुळे पिके करपु लागली होती. याबाबत आमदार महोदयांनी रेल्वे विभागाला पत्र देऊनही काहीच फरक पडत नव्हता. रोजच रेल्वेचे अधिकारी टोलवाटोलवी करत होते. यामुळे अक्षरशः तेथील शेतकरी संतप्त झाले होते. सरतेशेवटी आज बुधवार दिनांक ५ एप्रिल२०२३ रोजी आ. संजयमामा शिंदे नी डायरेक्ट रेल्वेचे सोलापुर येथील विभागिय कार्यालय गाठले. यावेळी

उद्योजक भरत आवताडे उपस्थित होते. डिआरएम  नीरजकुमार दोहरे यांचे दालनात जाऊन ठाण मांडले. पारेवाडी स्टेशनजवळ दिवेगव्हाण, राजुरी व इतर गावातील शेतकऱ्यांची व्यथा सांगितली व तुटलेली पाईपलाईन तातडीने जोडुन घेण्यासाठी सांगितले. त्यानंतर संबधित ठेकेदार तसेच अधिकारी यांनी शेतकऱ्यांना बोलावुन पाइपलाइन जोडणे कामी

कामकाज चालु केले. त्याचवेळेस आमदार साहेबांनी माहीती घेवुन कार्यालय सोडले. याबाबत शेतकरीअभिमन्यू मोरे, संतोष खाटमोडे, आप्पासाहेब पाडुळे, डॉक्टर भरत खाटमोडे, दादा जाधव, भारत खाटमोडे,  अंकुश खाटमोडे, अतुल खाटमोडे मोरे गुरुजी, जगताप यांनी आमदार साहेबांचे आभार मानले. याचवेळी रामवाडी, जिंती, भगतवाडी, गुलमरवाडी, पारेवाडी येथिल बोगदयाच्या ठिकाणी रस्ते, वॉल व ड्रेनेजची कामे देखिल तातडीने करणे बाबत सुचना केलेल्या आहेत. ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आमदार यांनी आज केलेल्या दमदार कामाची चर्चा होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *