
के-५ चांदगुड गल्ली, भवानीपेठ अंगणवाडी मध्ये पोषण पंधरवडा साजरा
करमाळा प्रतिनिधी
एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत के-५ चांदगुड गल्ली, भवानीपेठ येथे पोषण पंधरवडा हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात भरड धान्यापासून पदार्थ तयार करून व त्याचे महत्त्व उपस्थितांना सांगण्यात आले. हा कार्यक्रम के-५ या अंगणवाडी येथे सी.डी.पी.ओ. वर्षा पाटील व मुख्य सेविका सारिका सनगर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सर्व्हेतील गर्भवती, स्तनदा माता, बालक, पालक इ.उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अंगणवाडी सेविका वैशाली चांदगुडे व मदतनीस शौभा धुरेकर यांनी परिश्रम घेतले.

