
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचा निलाव सात ते आठ वाजता सुरू करावा
करमाळा प्रतिनिधी
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचा निलाव सात ते आठ वाजता सुरू करावा अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे. कोरोना काळामध्ये पहाटे साडेचार ते पाच वाजता भाजीपाल्याचे निलाव होत होते. परंतु आता कोरोना संपला तरीही भाजीपाल्याचा निलाव टायमिंग तोच ठेवल्यामुळे तालुक्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांना व शेतकऱ्यांच्या घरच्यांना भल्या पहाटे उठूनभाजीपाला घेऊन निलावाला यावा लागत असल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. काही शेतकऱ्यांना भाजीपाला मार्केटला आणत असताना जीव गमावा लागलेला आहे, करमाळा तालुक्यातील रस्ते खराब असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना हात पाय गमवावे लागलेले आहेत,

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाल्याचा निलाव सात ते आठ वाजता सुरू करावा व ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला कवडी मोलाने दलाल लोक घेत आहेत. शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा हा कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला व्यापाऱ्यांनी सुरू केलेला आहे. शेतकऱ्यांनात्यांचा येण्या जाण्याचा खर्च सुद्धा या भाजीपाला विक्रीतून होत नाही शेतामध्ये खर्च करून अहोरात्र पाणी देऊन खते बी बियाणे यांचा खर्च सुद्धा शेतकऱ्यांचा निघत नसल्यामुळे शेतकरी मोठा अडचणीत सापडलेला आहे. जर या आठ दिवसांमध्ये भाजीपाल्याचा निलाव सात ते आठ वाजता सुरू न केल्यास बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने निलाव बंद पाडण्याचं काम करण्यात येईल अशी माहिती

सुपनवर यांनी दिली. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भिमराव येडे, तालुका उपाध्यक्ष शिवाजीराव बनकर, तालुका युवा अध्यक्ष पद्माकर क्षिरसागर, निलेश पडवळे, समाधान मारकड, धनंजय शिंदे, विनोद महानवर, तात्यासाहेब काळे, दादा महानवर आदि जण पदाधिकारी उपस्थित होते.