
पारेवाडी रेल्वे स्टेशन नजिक गेट नं-२८ चे बोगद्याचे काम निकृष्ठ दर्जाचे
पारेवाडी प्रतिनिधी
विभागिय रेल्वे व्यवस्थापक सो.
डिआरएम कार्यालय- मध्य रेल्वे. सोलापुर.यांना रेल्वे संघटनेने निवेदन दिले आहे
म्हंटले आहे की, पारेवाडी रेल्वे स्टेशन नजिक गेट नं-२८ चे बोगद्याचे झालेल्या निकृष्ठ कामाबाबत व बोगद्यात प्रचंड पाणी साचत आहे

आम्ही ग्रामस्थ, प्रवासी आपणास विनंती पुर्वक तक्रार करतो की, आपले रेल्वे विभागाने गेट नं-२८ पारेवाडी रेल्वे स्टेशन बंद करून त्या ठिकाणाहुन बोगदयाचे काम केले असुन, ते काम अतिशय निकृष्ठ पद्धतीने झाले आहे. त्यामुळे संबधित ठेकेदारांची व कामाची तातडीने चौकशी होणेत यावी व उर्वरीत बिले अदा करू नयेत.तसेच सदर बोगद्यामधे १०० मीटर रस्ता सिमेंट काँक्रीट करणेचे उर्वरीत ठेवले आहे, तसेच ड्रेनेज करिता होणारी पाइपलाइन मधेच निधी अभावी थांबली आहे, दोन्ही बाजुला सिमेंट वॉलचे काम झालेले नाही, त्यामुळे सदर कामाबाबत आम्ही रेल्वे विभागाचे अधिकारी यांना विचारले असता, ते उडवाउडवीची उत्तरे देत असुन, या कामासाठी निधी उपलब्ध नसलेचे सांगत आहेत. या ठिकाणी प्रचंड प्रमाणात पाणी साठत असुन, ग्रामस्थ व प्रवाशांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याच बोगदयातुन आमचे येथे दहा ते पंधरा गावचे शाळकरी विद्यार्थी यांची रोजची ये- जा असते, या बाबत आपण तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा व दर्जेदार काम पुर्ण करावे. ही विनंती आहे.

येणे प्रमाणे तक्रार असुन, या तक्रारीची दखल आपण गांभिर्याने घ्यावी अन्यथा ग्रामस्थ प्रवाशांचे पुढील होणारे नुकसानीस आपले रेल्वे विभागास जबाबदार धरले जाईल असे रेल्वे प्रवासी संघटनेने सांगितले आहे