
करमाळा भाजपाची बुथ सशक्तिकरण अभियान संदर्भात आढावा बैठक संपन्न
करमाळा – भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बैठका या केंद्रीय कार्यकारणी, प्रदेश कार्यकारणी, जिल्हा कार्यकारणी होत असतात.
जिल्हा कार्यकारणीची बैठक संपन्न झाल्यानंतर तालुका कार्यकारिणी बैठक होत असते, याचाच एक भाग म्हणून केंद्रीय स्तरावरून बूथ सशक्तीकरण अभियान राबवले जात असून त्या अनुषंगाने करमाळा भाजपची बुद्धशक्तीकरणाची बैठक केमिस्ट भवन करमाळा येथे भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

या बैठकीचे प्रास्ताविक अमोल पवार यांनी केले, तर युवा मोर्चा प्रदेश चिटणीस दीपक चव्हाण, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीत मार्गदर्शन करत असताना गणेश चिवटे म्हणाले की, सर्व विस्तारक, शक्ती केंद्रप्रमुख व बूथ प्रमुखांनी आपल्या बूथ स्तरावर पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम व शासकीय योजना राबवून आपले बूथ सक्षम करावे असे आवाहन केले.
या बैठकीत राष्ट्रपतींच्या संसदेतील भाषणाचा मराठीतील अनुवादाचे वाचन तालुका चिटणीस आजिनाथ सुरवसे यांनी केले, तर सूत्रसंचालन विनोद महानवर यांनी केले.

या बैठकीसाठी तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, धनंजय ताकमोगे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, रामभाऊ ढाणे, मच्छिंद्र हाके, विजयकुमार नागवडे, सचिन गायकवाड, सागर नागटिळक, मोहन शिंदे, राजश्री खाडे, संगीता नष्टे, भैय्या गोसावी, दादासाहेब काळे, अमोल जरांडे, शरद सुपे, अरुण महाडिक, बापू लोंढे, किरण शिंदे, सोमनाथ घाडगे, संतोष बिनवडे, हर्षद गाडे, दयानंद बनगर, दत्तात्रय गाडे, तुकाराम भोसले, अशोक सातपुते, दीपक गायकवाड, ऋषिकेश फंड, संदीप काळे, माणिक निळ, अजय डवले, गणेश भिसे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.