
रंभापुरा एक आदर्श व्यसनमुक्त व स्वावलंबी तरुणांची गल्ली-महेश चिवटे
करमाळा प्रतिनिधी
स्वतःच्या पायावर कष्टातून खंबीरपणे उभा राहणारे तरुण व शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यावसायिक प्रतिकूल परिस्थितीतून रंभापुरा गल्ली तयार होत असून त्याचा आदर्श इतर गल्लीने घ्यावा असे आव्हान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले

शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा व आरोग्य शिबिराची माहिती देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर करमाळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अमोद शेठ संचेती उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील तालुकाप्रमुख देवानंद बागल शिवसेना युवा जिल्हा संपर्कप्रमुख प्रियदर्शन साठी तालुकाप्रमुख राहुल कानगुडे उपशहर प्रमुख नागेश गुरव शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रोहित वायबसे नागेश शेंडगे हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर जे जे युवा मंच अध्यक्ष जयराज चिवटे उपस्थित होते
यावेळी रंभापुरा शिवसेना शाखाप्रमुख निलेश चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले
युवा नेते शामराव ढाणे संभाजी ढाणे दत्तात्रेय ढाणे संजय टेकाळे संतोष ढाणे तात्या ढाणे ज्योतीराम ढाणे संतोष करंडे बळीराम दुधाट नितीन करंडे रामभाऊ करंडे अमर करंडे बाळासाहेब ढाणे नितीन ढाणे सचिन ढाणे सचिन कवडे नवनाथ गोडसे संतोष गोळे इत्यादी युवक रंभापुरा गल्लीतील महेश दादा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले त्यांच्या सर्वांचे आभार निलेश चव्हाण यांनी मानले

——–*
आधी युवा कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी लवकरच रंभापुरा येथे आरोग्य शिबीर घेऊन प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची आरोग्य तपासणी करणार असल्याची माहिती निलेश चव्हाण यांनी दिली
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा सत्कार रंभापुरा मित्र मंडळातर्फे करण्यात आला
पुढे बोलताना महेश चिवटे म्हणाले की रंभापुरा गल्लीतील तरुण हे एकजुटीने राहतात त्यामुळे त्यांचा संपूर्ण शहरात एक नावलौकिक आहे या भागातील तरुणांनी नवीन नवीन उद्योग उभा करून समाजाला नवीन दिशा देण्याचे काम केले आहे तसेच भैया गोडसे यांच्या मा ही डेकोरेशनचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
रामभाऊ ढाण्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तरुण पिढी योग्य दिशेने काम करत असून याचा आदर्श इतर गल्लीने घेतला तर संपूर्ण करमाळा शहर आदर्श झाल्याशिवाय राहणार नाही
जे काही कमवायचे ते स्वतःच्या कष्टाने व घामाने कमवायचे हा वसा या भागातील तरुणांनी घेतला आहे
कॉलेजला येणाऱ्या जाणाऱ्या मुला मुलींची संरक्षण करण्यासाठी रंभापुरातील तरुण मंडळी सदैव तत्पर असतात
अवैद्य धंद्याला थारा न देता किंवा दुसऱ्याला त्रास देऊन स्वतःचे घर भरण्याचं काम या भागातील तरुण कधीच करत नाहीत यामुळे रंभापुरा गल्ली बद्दल किंवा त्यातील प्रत्येक व्यक्तीबद्दल संपूर्ण शहरातील नागरिकांना आदर असल्याचे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील यांनी सांगितले