
कोर्टी मध्ये माकडांनी नागरीकांना जखमी केले तरीही वनविभाग दुर्लक्ष करत आहे
कोर्टी प्रतिनिधी
कोर्टी येथे ३ माकडांनी हैदोस घातला आहे. १० ते १५ नागरिकांना चावल्यामुळे ते जखमी झाले आहे. काहीजणांना सोलापूर येथे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले आहे. लहान मुले तर या माकडामुळे खूप घाबरत आहे.
या माकडांचा बंदोबस्त करावा याबाबतचे निवेदन कोर्टी येथील ग्रामस्थांनी वनविभागाला दिले आहे. वन विभाग या माकडांकडे दुर्लक्ष करत आहे. याबाबत ३-४ वेळा वन अधिकाऱ्यांना सांगण्यात आले तरी जिल्हा वन अधिकारी यांनी याबाबत ताबडतोब दखल घेऊन माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांनी केली.

