
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील सर्व शेतकरीच्या वतीने सुनील बापु सावंत यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 13/3/2023 जामखेड बायपास चौक येथे सकाळी 11 वा. कांदयाला हमी भाव मिळावण्यासाठी अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या शेतकरी ना नुकसान भरपायी मिळावी, तसेच महागाई, गॅस दर, पेट्रोल-डिझेल चे दर कमी करण्यात यावे यासाठी आंदोलन करण्यात येणार असुन सर्व शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सावंत यांनी केले आहे.

यावेळी तहसीलदार करमाळा यांना दिलेल्या निवेदनात सांगितले आहे की, सध्या कांदयाला बाजारात दर नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. महाराष्ट्र शासनाने नाफेड ची केलेली घोषणा चे पुढे काय झाले तसेच अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या शेतकरी ना अदयाप पर्यंत मदत मिळाली नाही, तसेच सध्या प्रचंड प्रमाणात वाढलेली महागाई डिझेल-पेट्रोल चे वाढलेले दर कमी करण्यात यावे यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे असे या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर सावंत गटाचे नेते सुनील बापु सावंत, बबन जाधव, मनोज गोडसे, प्रदीप हिरडे, रघुनाथ झिंझाडे, मोहन शिंदे, सुरेश जाधव, फारुक जमादार, नवनाथ झिंझाडे, पांडुरंग शिंदे, बापू उबाळे, चंद्रकांत पवार, आदी च्या सहया आहेत.