
जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धत न. पा. उर्दू शाळेचे जिल्हास्तरीय यश
करमाळा प्रतिनिधी
सोलापुर येथे आलेल्या जिल्हास्तरीय अभ्यासक्रमावर आधारित घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व जिल्हापरिषद, महानगरपालिका, नगरपालिका या उर्दू शाळेचे जवळपास शंभर शाळेच्या विद्यार्थी नी भाग घेतला होता यामध्ये कै. नामदेवराव जगताप नगरपालिका उर्दू शाळेचे विद्यार्थीने मोठ्या गटात हादिया जुबेर अहमद जनवाडकर, राफीया शेख हिने तृतीय क्रमांक पटकाविला तर लहान गटात लायाजा अनिस कुरेशी, खदिजा अफजल कुरेशी या विद्यार्थीनी तृतीय

क्रमांक पटकाविला असुन या विद्यार्थीना सोलापुर चे शिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्या शुभहस्ते मेडल व ट्राॅफी देण्यात आली. यावेळी अक्कलकोट चे गटशिक्षणाधिकारी कुदसिया शेख, सोलापुर महानगरपालिका चे प्रशासन अधिकारी हनुमंत जाधवर, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे अंकुश काळे, सोलापुर जिल्हा पतसंस्थेचे संचालक जुल्फेकार मुजावर, उर्दू माध्यम चे विस्तार अधिकारी दफेदार, दौलतबी नदाफ महेमुद नवाज, जावेद काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथमच जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धत उत्तुंग यश मिळविल्याबद्दल करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी

बालाजी लोंढे, प्रशासन अधिकारी बनसोडे, नगरसेवक संजय सावंत, नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, उपनगराध्यक्ष अहमद कुरैशी, मुस्लिम विकास परिषदेचे मार्गदर्शक फारुक जमादार, केंद्र समन्वयक दयानंद चौधरी, लिपीक शिवदास कोकाटे, शाळेचे मुख्याध्यापक जुबेर जनवाडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मझहर नालबंद, उपाध्यक्ष सादीक शेख़, सर्व शिक्षक व पालक यांनी विद्यार्थीचे अभिनंदन केले.
